राजकारण

Sanjay Raut on Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Published by : Dhanshree Shintre

कोणाचा डंपर पलटी होतोय आणि कोणाचा झंपर वर जातोय हे कळेल आता.. तुकारामांच्या अभंग गाथा या लोकांनी वाचाव्यात. अश्या नरा मोजूनी माराव्या पैजारा आणि या फडणवीस सारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पैजारा मारेल. हे तुकारामांनी सांगितलं आहे. डुक्कर कितीही चिखलात लोळलं आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता का तर तो म्हणेल चिखलच माझं स्वर्ग आहे ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची आहे असे संजय राऊत म्हणाले.

हे चिखलात लोळत आहेत आमच्याबरोबर असताना हे स्वर्गात होते, स्वर्ग सुखात आनंद घेत होते, आज त्यांच्या बाजूला दोन डबकी आहेत त्या डबक्यात हे डुकर लोळत आहेत. फडणवीस यांची सध्याची जी काय वचवत सुरू आहे हे त्यांचं नैराश्य आहे, निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो. ज्याने सर्वस्व गमावलं आहे आणि जा गमावायला जात आहे तोच असं वक्तव्य करु शकतो असा पलटवार राऊतांनी फडणवीसांवर केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ज्याप्रकारे तुफान निर्माण केलंय त्या तुफानाची यांना भीती वाटतेय, उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न या फडणवीसछाप सरकारने केला पण काही फायदा झाला नाही, ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये हे बसले आहेत. जो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे. या कचऱ्याच्या डंपर मध्ये बसून भाजप पक्षाचा प्रवास जर सुरू असेल तर महाराष्ट्र हा डंपिंग ग्राउंड नाही तर सगळा कचरा या डंपरसह महाराष्ट्राच्या सीमापार गुजरातमध्ये जाऊन आम्ही टाकणार आहोत हे मी फडणवीस यांना सांगू इच्छितो अशी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

"मोदी तुम्ही माझ्याशी लढा, माझ्या आई-वडीलांचा अपमान केला, तर..."; उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिला इशारा

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

टी-२० वर्ल्डकप सुरु होण्याआधी युवराज सिंगचं मोठं विधान, म्हणाला; "विराट कोहली वर्ल्डकप मेडल..."

Daily Horoscope 10 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना अक्षय तृतीयाचा दिवस शुभ; पाहा तुमचे भविष्य