Rohit Pawar | Bageshwar Baba
Rohit Pawar | Bageshwar Baba Team Lokshahi
राजकारण

बागेश्वर बाबांच्या वादग्रस्त विधानावर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, या बाबाची बडबड...

Published by : Sagar Pradhan

काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज बागेश्वर बाबा हे प्रचंड चर्चेत आले आहे. त्यातच आज ते पुन्हा एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. आक्षेपाहार्य विधान त्यांनी केले आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातून आता या वक्तव्यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार प्रतिक्रिया देत बागेश्वर बाबांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले विधानावर रोहित पवार?

बागेश्वर बाबांच्या विधानावर ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत.. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं… तुका म्हणे ऐशा नरामी, मोजूनी माराव्या पैजरा! असे रोहित पवार म्हणाले आहे.

काय होते बागेश्वर बाबाचे आक्षेपाहार्य विधान?

संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.

त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय. असे विधान त्यांनी केले आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...