imtiyaz Jaleel
imtiyaz Jaleel  Team Lokshahi
राजकारण

'हा अपघात नव्हे तर मर्डर' बुलढाणा अपघातावर जलील यांची संतप्त प्रतिक्रिया

Published by : Sagar Pradhan

बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. बसचा अपघात झाल्यानंतर बसने ताबडतोब पेट घेतला यावेळी बस मधील 25 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकळा पसरली आहे. या अपघातावर राजकीय प्रतिक्रिया येत असताना आता छ. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 'हा अपघात नव्हे तर मर्डर' याला मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचे आरोप त्यांनी केला.

नेमकं काय म्हणाले इम्तियाज जलील?

बुलढाणा अपघातावर माध्यमांना प्रतिक्रिया देतांना जलील म्हणाले की, कोणताही एक्सप्रेस-वे किंवा सुपर एक्सप्रेस-वे तयार होतो त्यावेळी रोड सेफ्टीचे नियम असतात. त्यामुळे समृद्धी महामार्गबाबत रोड सेफ्टीचे क्लियरेंस मिळाले होते का?, या महामार्गावर नेहमीच अपघात का होतात? असे सवाल त्यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, मी फक्त याच अपघातबद्दल बोलत नाही. मात्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मिडीया इव्हेंट करण्यात आला. उपमुख्यमंत्री फडणवीस गाडी चालवत आहे, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे बसले असल्याचे दाखवण्यात आले. या दोघांना फक्त काळजी याची वाटत होती की, आपली सत्ता गेल्यावर दुसरं कोणीतरी याचं उद्घाटन करेल. यासाठीच घाईघाईने या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याचेच हे परिणाम आहे. त्यामुळे याला मी अपघात म्हणत नाही. हा मर्डर आहे. या हत्यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघे जबाबदार असल्याचे जलील म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...