राजकारण

संजय राऊतांना झुकवायचं हेच त्यांचे उद्दिष्ट; चौकशीनंतर संदीप राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : खिचडी घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राजाराम राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले होते. यानुसार आज संदीप राऊत चौकशीसाठी हजर राहीले होते. यानंतर संदीप राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या बँक खात्यामध्ये किती पैसे आले आहेत त्या संदर्भात विचारपूस आर्थिक गुन्हे शाखा यांनी केलेली आहे. यापुढे देखील मी चौकशीला सामोरे जाईल. मात्र, कुठेतरी सुडबुद्धीने राजकारण केलं जात आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

कोरोना काळात माझ्या केटरिंग किचन वापरायल दिलं होतं. मदत म्हणून माझे पॅकिंगचे सामान देखील देण्यात आलं होतं. लाईट बिल, गॅस बिल इतर गोष्टी असं सर्व मिळून त्यांना देण्यात आलं होतं. त्यामध्ये मी कोणताच फायदा घेतला नाही. हे सूडबुद्धीचं राजकारण आहे. त्यांच्याकडे गेलेत, त्यांच्या मांडीवर जे बसले आहेत त्यांची चौकशी होत नाही. कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून त्यांची चौकशी होत नाही. मात्र, कुठेतरी संजय राऊत यांना वाकवायचं आणि झुकवायचे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, अशी टीका संदीप राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

संजय राऊत यांना जेलमध्ये टाकले तरी ते झुकले नाही आणि आम्ही झुकून देणार नाही. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी कोणताही त्याग करण्याची आमच्याकडे तयारी आहे. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवरती घसरले की घरच्यांना देखील त्रास देण्याचे काम सुरू आहे. काही नेत्यांना देखील त्रास देण्याचे काम सुरू आहे. येत्या 2024 ला सर्वांना कळेल काय काय होणार. काय प्रश्न विचारले ते तपासाचा भाग आहे मी सध्या त्यावर बोलू शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, खिचडी घोटाळा प्रकरणातील पैसे संदीप राऊत यांना सुद्धा मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे आर्थिक गुन्हा शाखेने म्हंटले आहे. यानुसार संदीप राऊतांना समन्स बजावला असून आज त्यांची चौकशी झाली. खिचडी घोटाळा प्रकरणात या अगोदर उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांची सुद्धा चौकशी झाली होती.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...