राजकारण

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच संजय राऊतांनी केलं वेगळंच भाकीत

Published by : Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं येणार. तेलंगणाचे मुख्यमंत्री देखील मागे आहेत. पण मला वाटत नाही ते हरतील. दोन तासात सर्व चित्र स्पष्ट होईल. तेलंगणामध्ये राहुल गांधी यांनी आपली जादू दाखवली. राजस्थान मध्यप्रेदशमध्ये देखिल हेच होईल.

तसेच ते म्हणाले की, अजूनही निकाल स्पष्ट नाही आहेत. तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होईल. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं राज्य येईल. मध्यप्रेदश आणि राजस्थानमध्ये भाजपाचा पराभव होईल. याची मला खात्री आहे. असे संजय राऊत म्हणाले.

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार