राजकारण

Sanjay Raut : त्यांना हे अधिकारी कोणी दिले? राऊतांनी दीपाली सय्यद यांना सुनावलं

Published by : Shweta Chavan-Zagade

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्वीटनंतर ही चर्चा जास्तच जोरात होऊ लागली आहे. यावर आता खासदार संजय राऊतांनी (sanjay raut) स्पष्टीकरण दिलं आहे.

"दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचं काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी आहेत. तसंच प्रवक्त्या देखील नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे", असं संजय राऊत म्हणाले. तसेच हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. तर एकत्र यावं असं का वाटणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळावरुन बोलताना ते राऊत म्हणाले की, आमचे मंत्री सात होते, दोघे नव्हते. इथे गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट दोघांमध्ये होत आहे. भाजपमध्ये घटना तज्ञ, कायदे तज्ञ यांची फार मोठी फौज आहे. त्याची पीसं काढतील. पण यात नैतिकता कुठे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, तुमच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शपथविधी करू शकला नाही. यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. घटना तुडवायची ठरवलं असेल तर मग तुमची मर्जी असंही राऊत म्हणाले.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा