bacchu kadu uddhav thackeray
bacchu kadu uddhav thackeray  Team Lokshahi
राजकारण

बरं झालं गुवाहटीला गेलो, उद्धव ठाकरे तर...; बच्चू कडूंचा टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पालघर : पंतप्रधान आवास योजनेमध्ये शहर आणि ग्रामीण निकषात बदल करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी हिवाळी अधिवेशन सुरू असताना पालघरात राहून तीन दिवस आंदोलन केलं होतं. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोनलस्थळी भेट देत समस्या जाणून घेतल्या. यानंतर बच्चू कडूंनी शिंदेंचे कौतुक करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, गेले तीन दिवस पालघर आंदोलन करत होतो. आतापर्यंतचा अनुभव आहे मुख्यमंत्र्यांना प्रश्न सांगितले की ते सोडवतात. आजही मुख्यमंत्री भेटायला आले व आता त्यांचे स्वप्नं लगेच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. गरिबीच्या सेवेचा पर्व सुरु झालं. बरं झालं गुवाहटीला गेलो. उद्धव ठाकरेंना सांगितले तर ते अ‍ॅक्शन पण घेत नव्हते, असा निशाणा त्यांनी साधले आहे.

पालघरात राहणाऱ्या भटक्या लोकांना न्याय मिळावा यासाठी 15 दिवस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्यांचे दुःख वेदना जाणून घेणार आहे. तसेच, पालघरात राहणाऱ्या लोकांची नोंद आता आमच्या डोक्यात झाली. तर सगळीकडे आता ही नोंद होईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरु होते. एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी गेले. त्यांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम

Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? घाटकोपरमधील गुजराती बहुल सोसायटीतील प्रकार

दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांची माघार; म्हणाले...

Sadabhau Khot : महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे