अविश्वास ठराव म्हणजे फुसकी बॉम्ब; बावनकुळेंची टीका

अविश्वास ठराव म्हणजे फुसकी बॉम्ब; बावनकुळेंची टीका

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला आहे. यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. अविश्वास ठराव हा पहिल्या दिवशी आणायला पाहिजे होतं. शेवटच्या दिवशी म्हणजे फुसकी बॉम्ब आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

अविश्वास ठराव म्हणजे फुसकी बॉम्ब; बावनकुळेंची टीका
अजित पवारांनाच अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाची माहिती नाही; शिंदे गटाने लगावला टोला

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अविश्वास ठराव हा पहिल्या दिवशी आणायला पाहिजे होतं. शेवटच्या दिवशी म्हणजे फुसकी बॉम्ब आहे. वीस-पंचवीस आमदार पुन्हा येणार आहे. उद्या जर हा विषय सभागृहात आला आणि मतदान झालं तर १८४ च्या वर मतं मिळतील. भावनात्मक पद्धतीने मिस अंडरस्टँडिंग करणेच विरोधकांचे काम आहे.

संपूर्ण विरोधक हे विधान भवनात राजकीय बोलले. अखंड महाराष्ट्राच्या विकास कसा होईल, सरकारकडून काय मिळेल, विदर्भाला काय मिळेल, मराठवाड्याला काय मिळेल यावर बोलले नाही. विरोधक केवळ टाइमपास करत आहेतत, वेळ खराब करतात. विरोधी पक्षांची भूमिका दुपट्टी आहे. विधान परिषदमध्ये एकमत नाही.

अडीच वर्षांमध्ये खोटे रॉयल्टी बनवून महसूल चोरी झाली. दोन कोटी रुपयांच्या धानाच्या घोटाळा भंडारा जिल्ह्यात झाला. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या सरकारने योग्य काम केलं नाही. धानाच्या बोनस मिळावा यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अडीच वर्ष अजित पवारांसमोर नाक रगडले. मात्र मिळाले नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

अविश्वास ठराव म्हणजे फुसकी बॉम्ब; बावनकुळेंची टीका
अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा - धनंजय महाडिक

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बीके शिवकुमार यांनी आम्ही कर्नाटकची एकही इंच जागा महाराष्ट्राला जाऊ देणार नाही, असे म्हणाले आहेत. कालपर्यंत विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षावर टीका करायचे. काँग्रेसने आता आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. बीके शिवकुमारांचा तुम्ही निषेध करणार आहात का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, आता महाविकास आघाडीने राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यासंबंधीचे पत्र मविआच्या नेत्यांनी विधानसभा सचिवांना दिले आहे. या पत्रावर 39 आमदारांच्या सह्या आहेत. पण, हा ठराव तांत्रिक पातळीवर टिकणे अवघड असल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com