अजित पवारांचे कर्तृत्व काय? केवळ शरद पवारांमुळेच...; बावनकुळेंचा घणाघात

अजित पवारांचे कर्तृत्व काय? केवळ शरद पवारांमुळेच...; बावनकुळेंचा घणाघात

अजित पवार लवकर संन्यास घेणार असल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले आहे.

नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दीक वाद रंगला आहे. तर, बावनकुळेंच्या उत्तरावर अजित पवारांनी लवकर संन्यास घेणार असल्याचे विधान केले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले आहे. अजित पवार हे शरद पवारांमुळे मोठे झाले आहेत. त्यांचे काय कर्तृत्व आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांचे संन्यास घेण्याचे दिवस लवकर येतील. अजित पवार हे शरद पवारांमुळे मोठे झाले आहेत. त्यांचे काय कर्तृत्व आहे. पदावर बसले की सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून सत्ता यापेक्षा काय केलयं. त्यांच्या करेक्ट कार्यक्रमाची आम्ही वाट बघतोय, अशी घणाघाती टीका त्यांनी अजित पवारांवर केली आहे.

बारामतीचा विकास म्हणजे लोकसभेचा विकास नाही. 2024 मध्ये राष्ट्रवादी नक्की कमी होईल, असाही दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी सभागृहात बावनकुळे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे म्हंटले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार रडतात, डोळ्यात पाणी आणतात त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. 2024 मध्ये अजित पवारांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, असे सडेतोड उत्तर दिले होते. यावर बोलताना राजकारणातून संन्यास घ्यावा. 2024ला असा अपमान होण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com