Sanjay Raut | Sanjay Shirsath
Sanjay Raut | Sanjay Shirsath Team Lokshahi
राजकारण

राऊत यांना पिसाळलेले कुत्रे चावले आहे, शिरसाट यांची राऊतांवर बोचरी टीका

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. हा वाद सुरु असताना आज शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. बंडखोरी झाल्यापासून संजय राऊत हे शिंदे गटावर कायम टीका करत असतात. यावेळी नाशिकमध्ये असताना सुद्धा त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गट आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

काय म्हणाले शिरसाट?

मुंबईत बोलत असताना शिरसाट म्हणाले की, संजय राऊत यांना पिसाळलेले कुत्रे चावले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते शांत का होते? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. तुमच्या हून अधिक शिवसेना आम्ही पाहिली आहे. तुम्ही आम्हाला शिकवू नये. तुम्ही भुंकत राहा याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. अशा शब्दात जोरदार टीका शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

नाशिकमध्ये काय म्हणाले राऊत?

माझा पिंड रिपोर्टरचा आहे. त्यामुळे कुणाच्या डोक्यात काय क्राईम चाललंय हे मला पक्क कळतंय आहे. त्या गटात एकमेकांच्या विरोधात काय चालू आहे याची पक्की खबर मला आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. मात्र, त्यांनी हिंट देण्यास नकार दिला. हिंट कशाला देऊ. स्फोट होईल तेव्हा कळेलच. त्यांच्यातील ठिणग्या उडत आहेत, असं राऊत म्हणाले.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल