राजकारण

ठाकरे गट - शिंदे गटाचे भवितव्य ठरणार; आमदार अपात्रतेचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार?

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल बुधवारी येणार असल्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्ष विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये निकाल वाचन करणार असल्याचे सांगितले जात आहे. १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरदरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार होत असल्याची माहिती मिळत आहे.

पक्ष कुणाचा आणि आमदार पात्रता ठरविण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उद्या बुधवारी सायंकाळी चार वाजता निकाल लागणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

"मुंबई-ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघाची डरकाळी फुटली"; पदाधिकारी मेळाव्यात CM शिंदेंचं मोठं विधान

Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या...

Mother's Day 2024: मातृदिनाला आईसोबत नक्की भेट द्या 'या' धार्मिक स्थळांना

Daily Horoscope 11 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या संपत्तीत होईल भरभराट; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 11 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना