राजकारण

कार्यकर्त्याचे कुटुंब पाहत होते वाट, सीतारमण संतापल्या; 'मिशन बारामती' होणार फेल?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बारामती : राज्यात एकीकडे राजकीय खळबळ माजलेली असताना नुकताच राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा पार पडला. अशातच भाजपने स्वबळावर आगामी निवडणुकीत लढण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीकडे भाजपचं विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आजपासून तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत. परंतु, दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन कार्यकर्त्यांवर संतापल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजपासून ‘मिशन बारामती’ मोहिमेला सुरुवात केली. सासवडमध्ये बूथ अध्यक्षांची मिटींग घेतली आणि त्या लगेच बाहेर आल्या. मात्र, ज्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी ही बैठक झाली होती. त्यांच्या कुटुंबाला अर्थमंत्र्यांसोबत एक फोटो काढायचा होता. सीतारामन बाहेर आल्यानंतर भाजप कार्यकर्ताही बाहेर आला आणि त्याने मॅडम आमचं पूर्ण कुटुंब सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी थांबले आहे, अशी विनंती केली.

त्याच्या या मागणीवर निर्मला सीतारामन कार्यकर्त्यावर जोरदार भडकलेल्या पाहायला मिळाल्या. सीतारामन यांनी फोटो काढण्यावरुन कार्यकर्त्याला झापले. यामुळे कार्यकर्ते काहीसे नाराज झाल्याचे दिसले. दरम्यान, ते कार्यकर्ते म्हणाले की, माझ्या वडिलांपासून आम्ही भाजपचे काम केलं म्हणून आम्ही तो आग्रह धरला होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर समीकरण बदलून गेले आहेत. त्यातच आता संधीचा फायदा घेत भाजपने जोरदार फिलडिंग लावली आहे. भाजपने थेट आता राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ल्यावर झेंडा फडकावण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपचे बडे नेते बारामतीचा दौरा करत आहेत. परंतु, पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन यांनी कार्यकर्त्याला झापल्याने मिशन बारामती यशस्वी होणार का, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा