राजकारण

भाजपला मविआचा धक्का; नागपुरातून सुधाकर अडबाले विजयी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहे. सुधाकर अडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांना मोठ्या फरकाने पराभूत केले आहेत. यामुळे बालेकिल्ल्यात भाजपला हादरा बसला आहे.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना 14069 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांना 6366 मते मिळाली. यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे.

सुधाकर अडबाले यांच्यासाठी ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामे केली. त्याच्यामुळे हा विजय झालेला आहे. भाजपचे समर्पित उमेदवार नागो गाणार यांच्या प्रतिशिक्षकांमध्ये नाराजी होती, असे मत नागपूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी व्यक्त केले आहे.

तर, नाना पटोले यांनी भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी, असे टि्वट करत आनंद व्यक्त केला आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...