राजकारण

नवले पुलाजवळील अपघातप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : नवले पूल येथे अपघाताची मालिका अद्यापही सुरूच असून सोमवारी एका कंटेनरने तब्बल 48 गाड्यांना धडक दिली होती. यात सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. या ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मनीराम यादव असे या ट्रक चालकाचे नाव आहे.

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरवरील (एपी 02 टीई 5858) चालकाचे नियंत्रण सुटले आणि 48 गाड्यांना उडवत कंटेनर वाडगाव पुलाजवळ आदळला. यानंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच, या अपघाताची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. तर, प्रथमदर्शनी ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याचे समजत होते. मात्र, तपासाअंती चालकाने उतारावरुन गाडी बंद केल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व अखेर आज ट्रक चालकाला पकडण्यात यश आले आहे. चाकणमधून मनीराम यादव याला ताब्यात घेतले आहे.

काय घडले नेमके?

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने 48 गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यात सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले होते. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल, सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले. सुमारे १२ ते १५ रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आल्या होत्या. सुदौवाने कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Deepak Kesarkar on Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर दिपक केसरकरांची प्रतिक्रिया