Crime
Crime Team Lokshahi
राजकारण

इंदापूरमध्ये किळसवाणा प्रकार समोर! तरुणास चारली मानवी विष्ठा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काटी येथे घृणास्पद कृत्य समोर आले आहे. लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण करण्यासह लिंबू, हळद लावून शिव्या-शाप देत त्याला लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडले. आरोपींनी या तरुणास मानवी विष्ठा खाण्यासह लघवी पिण्यास आणि गुद्द्वार चाटण्यास भाग पाडल्याचा अघोरी प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी माढा तालुक्यातील बेंबळे येथील अनिकेत विजय भोसले याने इंदापूर पोलिसात ११ जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ४ महिलांचा देखील समावेश आहे.

माहितीनुसार, फिर्यादीचे ३ वर्षांपूर्वी आरोपींच्या मुलीशी जमलेले लग्न हुंड्यामुळे फिस्कटले होते. या प्रकरणी वाद विकोपाला गेला व त्यानंतर फिर्यादीने ९ एप्रिल २०२३ रोजी मुलीला पळवून नेले. ११ एप्रिल २०२३ रोजी सबंधित मुलीशी लग्न करायचे असेल तर ५ लाख हुंड्याची मागणी करत आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. याच वेळी या तरुणाशी अमानुष लज्जास्पद कृत्य केले. विशेष म्हणजे नवरी मुलीसह आरोपी महिलांशी देखील या तरुणाला लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल माध्यमात शेअर करण्यात आल्याचंही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, फिर्यादीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून आरोपींमध्ये स्वप्नाली कासलिंग शिंदे, दीदी अजय पवार, वंदना बापूराव शिंदे आणि मंदा काळ या 4 महिलांसह दिनेश शिंदे, लखन काळे, अजय पवार, दिनेश शिंदे, बापूराव शिंदे, कासलिंग शिंदे, अतुल काळे यासह अन्य एकाचा समावेश आहे. यापैकी तिघा जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

IPL 2024 : आता चेन्नई सुपर किंग्जसाठी खतरा! RCB ला 'प्ले ऑफ'मध्ये पोहचवणार '18'; जाणून घ्या या नंबरचं खास कनेक्शन

Kalyan Lok Sabha: मोदींच्या सभेत स्टेजवर स्थान नसल्याने मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा

Chicken Momos Recipe: घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीत बनवा चटपटीत चिकन मोमोज; जाणून घ्या रेसिपी...

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्यासाठी मोठी घोषणा, भारताने टॉप-४ मध्ये प्रवेश केल्यास 'या' ठिकाणी रंगणार सामना

Sambhajinagar च्या पाणी प्रश्नावरून न्यायाधीश उतरले रस्त्यावर