Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Team Lokshahi
राजकारण

काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही नको, शिवसेनासोबतच्या युतीबाबत आंबेडकरांचे मोठे विधान

Published by : Sagar Pradhan

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी सुरु असताना काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वीच वंचित आणि ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्यांची युतीबाबत बैठक पार पडली. मात्र, त्यानंतर अद्यापही युतीबाबत कुठलेही माहिती समोर आलेली नाहीये. त्यातच वंचित शिवसेनासोबत युतीकरणार की महाविकास आघाडीसोबत याबाबत संभ्रम होता. परंतु, प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

काय म्हणाले आंबेडकर?

नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोड हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ठाकरे यांची काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेण्याची इच्छा आहे. आमचाही दोघांना विरोध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांनी घेऊन यावे. आपण त्यांच्या गळ्यात हार घालायला तयार आहोत. पण त्यांनी मान पुढे करायला हवी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ओबीसी, गरीब मराठा सत्तेत नको आहे. आमची भूमिका गरीब ओबीसी, मराठांसोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला आपण नको आहे. यामुळे आघाडीला मुहूर्त लागत नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. आता आघाडी संदर्भातील पुढील निर्णय उध्दव ठाकरे यांनी घेतील हे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे त्यांनी नुकताच झालेल्या मुंबई दौऱ्यावर देखील त्यांनी टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान आता थेट मनपा निवडणुकीत प्रचाराला येत आहेत. देशात सध्या हुकुमशाही, दंडेलशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने (ठाकरे गट) आमचा पाठिंबा मागितलेला नाही. शिवसेनेसोबत अद्याप आमचे नाते जमलेले नाही. आम्ही सध्या केवळ एकमेकांना खाणाखुणा करीत आहोत, अशा विनोदी शैलीत त्यांनी उत्तर दिले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...