Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray  
राजकारण

आम्ही हेरलं म्हणून चोरलं, ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर

Published by : Pankaj Prabhakar Rane

भिवंडी : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीच्या खेडमध्ये (Khed) जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप (BJP) आणि शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena Shinde Group) यांच्यावर निशाणा साधलाय. सगळं चोराल पण शिवसेना चोरू शकणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) घणाघाती टीका केलीय. त्याचवेळी भाजपवरही जोरदार टीका केलीय. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही हेरलं म्हणून त्यांना चोरलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. नाकाखालून 40 जण निघून घेल्याची निराशा खेडमधील सभेत दिसल्याची टीकाही फडणवीसांनी यावेळी केलीय.

उद्धव ठाकरे यांची रविवारी खेड येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत भाजपवरील टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की, तेच शब्द, तिच वाक्य, तेच टोमणे या व्यतिरिक्त काहीही नवीन यांच्याकडं नाही, खरं म्हणजे त्यांच्या नाकाखालून 40 लोक निघून गेल्याचा संताप आणि निराशा तसेच त्यांच्या भाषणात हताशपणाही दिसून येत होता. त्यामुळं अशा हताश भाषणावर आणि टोमण्यांवर काहीही प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडीत गेले होते.

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषकाचं भव्य आयोजनही करण्यात आलं होतं. कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी सरकारच्या 'हर घर जल, हर घर नल' या योजनेचा केक तयार केला होता. हा केक कापून मंत्री कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर भन्नाट अशी फलंदाजी देखील केली.

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट

हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी