राजकारण

लोकशाही मराठी चॅनलविरुद्ध केलेल्या कारवाईचा यशोमती ठाकूर यांनी केला निषेध; म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी कारवाईचा निषेध केला आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्विटरवरुन या कारवाईचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या की, लोकशाही वृत्तवाहिनीवर करण्यात आलेली प्रक्षेपणबंदीची कारवाई अत्यंत चुकीची आहे. मदर ऑफ डेमॉक्रसी असलेल्या भारतात माध्यमांनी केलेल्या वृत्तांकनाचा फटका सत्ताधारी पक्षाला बसला म्हणून माध्यमांवर बंधने आणणे चुकीचे आहे. या कारवाईचा मी निषेध करते, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, या कारवाईसंदर्भात मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी माहिती दिली आहे. किरीट सोमय्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नोटीस आली होती. या नोटीसीला उत्तरही देण्यात आलेले होते. आम्हाला पुढील 72 तास चॅनेल बंद करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून 72 तासांसाठी लोकशाही चॅनेल बंद करण्यात आलेलं आहे. सूचनांचे आम्ही पालन करुच, पण, आमची बाजू ऐकून घेण्याची अपेक्षा होती. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतु, आम्हाला थेट शिक्षा सुनावल्याचा एक प्रकार आहे. याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती कमलेश सुतार यांनी दिली आहे.

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई