ताज्या बातम्या

'लोकशाही मराठी'चा आज 'लोकशाही संवाद 2023'; दिग्गज नेत्यांची हजेरी

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2023' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. दिवसभर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खास आकर्षण म्हणून आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची टीमही उपस्थित राहणार आहे.

'लोकशाही संवाद 2023' या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण तुम्ही आज सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लोकशाही न्यूज चॅनलसोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पाहु शकता. लोकशाही युट्युब चॅनेलवर हा कार्यक्रम दिवसभर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.

Follow us on :

Website: https://www.lokshahi.com/

Google News : https://www.lokshahi.com/

Facebook: https://www.facebook.com/LokshahiMarathi/

Instagram: https://www.instagram.com/lokshahimarathi/

Twitter : https://twitter.com/LokshahiMarathi

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक