अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील सहा जंगलांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. ही आग कॅलिफोर्निया रहिवासी भागातही पोहोचली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. आणि 1 हजार 100 हून जास्त इमारती जळून खाक झाल्या आहेत. तर एक लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या आगीचा फटका 27 हजार एकर क्षेत्रफळाला बसला असून जंगल वाचवण्यासाठी हजारो हात झटत आहेत.
या अग्नीतांडवात 150 बिलीयन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं आहे. त्याचसोबत अमेरिकेतल्या लॉस एजेलीसला महाभयानक अगीचा विळखा घातला असून या आगीत हजारो घर आणि हजारो हेक्टर जंगल जळून खाक झाले आहेत. या भागात सोसाट्याचा वारा वाहत असल्याने आग विझविण्याचं काम अधिक अवघड झालं आहे. या वाऱ्यामुळे जंगलांना आग लागताच ती पसरत गेली.
त्याचसोबत अमेरिकेतली लॉस एंजेलिस जंगलात शहरात लागलेल्या भयंकर आगीमुळे एक आलीशान घर आगीत जळतानाचा व्हिडीओ सोशव मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेतील ऑनलाइन रिअल इस्टेट मार्केटप्लेस Zillow वर हे घर 35 मिलीयन डॉलर्स म्हणजे भारतात ते अंदाजे 288 कोटी एवढ्या किमतीला विकत घेण्यासाठी उपलब्ध होते. मात्र लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या विनाशकारी आगीने या घराला पुर्णपेणे वेळखा घातला आणि हे घर या वणव्यादरम्यान जळून खाक झाले आहे.