ताज्या बातम्या

'या' पाच घरगुती पदार्थांच्या मदतीने वजन करा झटपट कमी

घरगुती उपायांच्या मदतीने आपले वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या 'या' वस्तूंचे योग्यरित्या मिश्रण केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील.

Published by : Rashmi Mane

कितीही आहार बदलला, जिम लावलं, जंक फूड खाणे टाळलं तरी वजन काही ग्रॅमखेरीज कमी होत नसल्याचे अनेकदा ऐकायला मिळते. वाढते वजन ही आजच्या जनरेशनची गंभीर समस्या बनली असून त्यासाठी महिलांसह पुरुषही विविध उपायांचा अवलंब करतात. सध्या बाजारातही वजन कमी करण्यासाठीच्या गोळ्या, पोटाला लावण्यासाठीचे जेल किंवा तेल, चरबी वितळवणारी इलेक्ट्रिक बेल्ट इत्यादी वस्तू सर्रास विकत असल्याचे पाहायला मिळते. पण खरच या गोष्टींचा उपयोग होतो का, लोकांना अपेक्षित रिजल्ट मिळतो का, याचे सर्वेक्षण केल्यास उत्तर नाही असेच मिळेल. मात्र काही घरगुती उपायांच्या मदतीने आपले वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या या वस्तूंचे योग्यरित्या मिश्रण केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील.

'हे' पाच पदार्थ आवश्यक -

जिरे, ओवा, अळीव, बडीशेप, दालचिनी

असे करा मिश्रण तयार -

जिरे - २ चमचा, ओवा - २ चमचा, अळीव - २ चमचा, बडीशेप - २ चमचा आणि दालचिनी - १ चमचा या प्रमाणात तव्यावर चांगल फाजून घ्याव. नंतर हे पदार्थ एकत्रितपणे मिक्सरमध्ये वाटून घ्याव. फार बारीक पूड करू नये. एका डब्यात हे पदार्थ भरून ठेवावे. दररोज रात्री जेवल्यानंतर एक तासाने थोड्या कोमट पाण्यात एक चमचा हे मिश्रम मिसळून पाणी एक एक घोट करून प्यावे.

'या' पदार्थांचे होतात असे फायदे -

जिरे - वजन कमी करण्यासाठी जिरेचे पाणी अत्यंत प्रभावी आहे. चयापचय आणि पचन सुधारण्यास मदत करते. या कडक उन्हाळ्याच्या दिवसात तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी जिरेचे पाणी ताजेतवाने पदार्थ म्हणून काम करू शकते.

ओवा - वजन कमी करण्यासाठी ओव्याचा अधिक फायदा मिळतो. ओवा आतड्याचे आरोग्य सुधारून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तसंच मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करण्यासाठी ओव्याचा उपयोग करून घेता येतो.

अळीव - अळीवमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

बडीशेप - बडीशेपचा पचन सुधारण्यास आणि भूक कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

दालचिनी - दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि चयापचय वाढवण्यास देखील मदत करू शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?