ताज्या बातम्या

लोटे एमआयडीसी पुन्हा स्फोटाने हादरली

डीवाईन केमिकल कंपनीत सात कामगार होरपळले

Published by : Sagar Pradhan

निसार शेख| चिपळूण: रत्नागिरी जिल्हयात चिपळूणजवळ लोटे एमआयडीसीतील डीवाईन केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने जवळपास सात कामगार होरपळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. डिवाइन केमिकल कंपनीमध्ये फेब्रिकेशनचे काम सुरू असताना केमिकल सॉलवंटने पेट घेतल्याने हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेत सात कामगार होरपळले आहेत.

जखमी कामगारांना चिपळूण येथील लाईफ केअर व अप्रांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील सात ही कामगार यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबई ऐरोलीतील बर्णी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.दरम्यान या घटनेनंतर कंपनीने गेट बंद केले आहे. अनेकदा याठिकाणी आशा घटना घडत असतात यापूर्वीही आशा स्वरुपाच्या घटनांमध्ये अनेक कामगारांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अद्याप कंपनी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट