ताज्या बातम्या

GT vs LSG IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरातला दणका; 33 धावांनी सामना जिंकला

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या आयपीएलचा (IPL) गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला.

Published by : Rashmi Mane

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या आयपीएलचा (IPL) गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्सने 33 धावांनी जिंकला. गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी 236 धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण लखनऊच्या गोलंदाजांनी गुजरातला 202 धावांवर रोखलं. गुजरातच्या पराभवासह पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुणतालिकेत टॉप 2 मध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे.

गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३६ धावा करायच्या होत्या. या सामन्यात गुजरातचा साई सुदर्शन 16 चेंडूत 21 धावा करत माघारी परतला. तर कर्णधार शुबमन गिल 20 चेंडूत 35 धावा खर्च करत माघारी परतला. नंतर जोस बटलरही 33 धावांवर माघारी परतला. शेवटी शेरफेन रुदरफोर्ड आणि शाहरुख खानने मोठे फटके मारले आणि संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं. पण शाहरूख खान 57 तर रुदरफोर्ड 38 धावा केल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा