ताज्या बातम्या

MADC Board Meeting : शिर्डी विमानतळाचा कुंभमेळ्यासाठी विस्तार; अमरावती, कराड विमानतळ प्रकल्पांना गतीचे नियोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची ९१ वी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

Published by : Team Lokshahi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची ९१ वी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिर्डी, अमरावती, लातूर, कराड, चंद्रपूर व गडचिरोलीसह विविध विमानतळांच्या विकास आणि विस्तारीकरणाच्या प्रकल्पांना गती देण्याचे नियोजन करण्यात आले. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली असून, येथे दोन हेलिपॅड्स आणि आठ वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.

औद्योगिक दृष्टिकोनातून वाढती गरज लक्षात घेता अमरावती विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचे नियोजन असून, महसूलवाढीच्या दृष्टीने सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. लातूर विमानतळाचा विकास केल्यास बीड व धाराशिवसारख्या शेजारील जिल्ह्यांनाही लाभ होईल, अशी भूमिका मांडण्यात आली. कराड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करण्यासाठी विकासाला गती देण्यात येणार आहे.

चंद्रपूर येथे चार्टर्ड विमानांसाठी धावपट्टी वाढविण्याची सूचना देण्यात आली असून, गडचिरोली विमानतळासाठी दोन ते तीन पर्यायी जागांचा विचार करण्यात येईल. सध्या राज्यात प्रादेशिक हवाई जोडणी योजनेंतर्गत १६ मार्गांवर विमानसेवा सुरू असून, आणखी आठ नवीन प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. यावेळी रत्नागिरी, अकोला, कोल्हापूर, नांदेड, धुळे आदी विमानतळ प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा