ताज्या बातम्या

Madhukar Pichad: माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन

माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घ्या.

Published by : Team Lokshahi

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली होती माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली होती. त्यादरम्यान त्यांना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तर आता माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले आहे.

वयाच्या 84व्या वर्षी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मधुकर पिचड यांच संपुर्ण नाव मधुकर काशिनाथ पिचड आहे तर त्यांचा जन्म 1 जून 1941 ला आदिवासी समुहातील महादेव कोळी समाजात झाला. यांच्या राजकीय कारकीर्दीला 1972 साली सुरुवात झाली. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली होती आणि तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात केली.

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची राजकीय कारकीर्द

1972 साली राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून 1972 ते 1980 पंचायत समितीवर सभापती म्हणून मधुकर पिचड यांची निवड झाली. 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले आहेत. तसेच 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती.

मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, 2014 ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडून आणले. 2019 ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला.

त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला. मधुकर पिचड यांनी 1961 मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. मधुकर पिचड यांनी 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना देखील स्थापन केला. आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा