Madhya Pradesh Accident Team Lokshahi
ताज्या बातम्या

Madhya Pradesh Accident : मध्यप्रदेश बैतूलमध्ये बस आणि तवेरा कारचा भीषण अपघात

मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये काल रात्री भीषण अपघात झाला. बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये काल रात्री भीषण अपघात झाला. बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मृतांमध्ये 5 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.

गुडगाव ते भैसदेही दरम्यान हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व जण अमरावतीहून आपापल्या घरी परतत होते. त्यावेळी कार चालकाला डुलकी लागली आणि कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बसला धडकली.

ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बैतूलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते