कुणाल कामराच्या बाबतीत एक नवीन माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. एका गाण्यावर वादंग सुरु असताच त्याने 'हम होंगे कंगाल...' हे गाणं शेअर केले. या प्रकरणी कुणाल कामरावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला. मात्र त्याला आता न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
कुणाल कामराला 7 एप्रिल पर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचा अटकपूर्व जामीन मद्रास हायकोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे.