Mafi Mango Raj Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

Video : माफी मांगो राज ठाकरे...भोजपुरी गाण्यानं घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

भाजप खासदार बृज भुषण सिंहांची 'राज'मार्ग रोखण्यासाठी तयारी; भोजपुरी गाण्यातून राज ठाकरेंना आव्हान

Published by : Team Lokshahi

राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेतून सुरु केलेल्या या इनिंगनंतर ठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये झालेल्या सभा आणि कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी अस्मितेचा मुद्दा बाजुला सारत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन नव्यानं मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंना आता अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला बृज भुषण सिंह (Brij Bhushan Singh) वारंवार आव्हान देत आहेत. यावरुनच आता एक भोजपुरी गाणं देखील तयार करण्यात आलंय. (Mafi Mango Raj Thackeray Song)

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आता भोजपुरी गाण्यातून सुद्धा आव्हान देण्यात आलं आहे. भाजप खासदार बृज भुषण सिंहांनी दिलेल्या आव्हानंतर आता या गाण्यातून देखील त्यांना आव्हान देण्यात आलं आहे. तर तिकडे बृज भुषण सिंह यांनी आता 'राज ठाकरेंनी आता माफी मागितली तरी त्यांना 5 जूनला अयोध्येत प्रवेश नाही' असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य