ताज्या बातम्या

Maha Vikas Aghadi Manifesto: महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा; जाहीरनाम्यात काय?

महाविकास आघाडीचा जाहीरनामा: शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, महिलांसाठी एसटी प्रवास मोफत

Published by : shweta walge

भाजपनंतर आता महाविकास आघाडीनेही रविवारी (11 Noveber ) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मविआने आपल्या जाहीरनाम्यात 100 दिवसांचा अजेंडा जाहीर केला. पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा ४,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात महाराष्ट्रात नवे औद्योगिक धोरण बनवण्याबाबत सांगितले आहे.  आज मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाराष्ट्राचा जाहीरनामा समोर आज ठेवत आहे.

महाविकास आघाडीचा जाहीरनामा

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि इतर सोयी सुविधा

मुलींसह मुलांनाही फीमध्ये सवलती देणार

महिलांसाठी एसटी प्रवास फ्री

शेतकऱ्यांच्या कृषी विजबिलात सवलत

जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर करणार

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार

जातनिहाय जनगणना करणार

6 सिलेंडर प्रत्येकी 500रुपयात करणार

बेरोजगारांना दरमहा 4,000 रुपयांची आर्थिक मदत


मोफत औषधांची सुविधा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच