प्रयागराज येथे सोमवारपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात होणारे आहे. त्यापूर्वी श्री पंचायती आखाडा बडा उदासीनचे महंत आणि संतांनी महाकुंभात प्रवेश केला आहे. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचबरोबर अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या आध्यात्मिक गुरू स्वामी कैलाशानंद गिरी जी महाराजांच्या आश्रमात पोहोचल्या आहेत.
दरम्यान महा कुंभाच्या वेळी त्रिवेणी घाटावर स्नान केल्याने मनुष्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात अशी मान्यता आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटे 05: 03 मिनिटांनी महा कुंभाच्या पहिले शाही स्नानाला सुरूवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 14 जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीला दुसरे शाही स्नान असेल.
तसेच 29 जानेवारी मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमा आणि अखेर 26 फेब्रुवारी महाशिवरात्री यादिवशी शाही स्नान केले जाईल. तर साधूंची मांदियाळी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशविदेशांतून असंख्य साधुसंत आले असून, ते भाविकांच्या आकर्षणाचा विषय बनले आहेत.