Mahaparinirvan Din Specia Mahaparinirvan Din Specia
ताज्या बातम्या

Mahaparinirvan Din Special : 4 ते 8 डिसेंबरदरम्यान आंबेडकरी अनुयायांसाठी राज्यभरातून धावणार विशेष रेल्वेगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान, राज्यभरातील विविध शहरांमधून 15 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

(Mahaparinirvan Din Special ) मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान, राज्यभरातील विविध शहरांमधून 15 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. हे गाड्या नागपूर, नाशिक, वर्धा या प्रमुख ठिकाणांवरून सुटणार आहेत.

प्रत्येक वर्षी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईत येतात. त्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. या विशेष गाड्यांचा वापर 5 दिवस चालणार आहे.

वेळापत्रक:

4 डिसेंबर रोजी नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) विशेष गाड्या:

गाडी 01260: 18:15 वाजता नागपूरहून सुटेल आणि 10 :55 वाजता CSMT पोहोचेल.

गाडी 01262: 23 :55 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 15 :30 वाजता CSMT पोहोचेल.

५ डिसेंबर रोजी विशेष गाड्या:

गाडी 01264: 08 :00 वाजता नागपूरहून सुटेल आणि CSMT वर 23 :45 वाजता पोहोचेल.

गाडी 01266: 18 :15 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10 :55 वाजता CSMT पोहोचेल.

थांबे:

अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, अकोला, जालंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, इगतपुरी, कल्याण, दादर इ.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर मार्गावर गाड्या:

6 डिसेंबर रोजी गाडी 01249 CSMT ते नागपूर, 20 :50 वाजता सुटेल.

7 डिसेंबर रोजी गाडी 01251 CSMT ते नागपूर, 10 :30 वाजता सुटेल.

8 डिसेंबर रोजी गाडी 01257 CSMT ते नागपूर, 00:20 वाजता सुटेल.

दादर - नागपूर विशेष गाडी:

गाडी 01253 दादर ते नागपूर, ००:४० वाजता सुटेल आणि 16 :10 वाजता नागपूर पोहोचेल.

इतर गाड्यांची माहिती:

कलबुरगी - CSMT - कलबुरगी मार्गावर 5आणि 7 डिसेंबर रोजी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

अमरावती - CSMT - अमरावती मार्गावरही 5 आणि 7 डिसेंबर रोजी गाड्या चालवण्यात येतील.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा