ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Meeting : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून ५० लाखांची मदत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्यण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Published by : Rashmi Mane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचा महत्त्वाचा निर्यण यावेळी मंत्रिमंडळात घेण्यात आला. तसेच मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय -

1. टेमघर प्रकल्प, ता. मुळशी, जि. पुणे येथील उर्वरित कामे व धरण गळती प्रतिबंधक कामासाठी 488.53 कोटी रुपये किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

2. मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम, 1951 अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियम, 1964 मधील नियम 27(ब) (3) मधील तरतूदीमध्ये सुधारणा. भिक्षागृहातील व्यक्तींना 5 रुपयांऐवजी आता 40 रुपये प्रतिदिन. 1964 नंतर प्रथमच बदल (महिला व बाल विकास विभाग)

3. PM-YASASVI या एकछत्री योजनेअंतर्गत ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 2025-26 या वर्षांकरिता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

4. हडपसर ते यवत राज्य मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग व अस्तित्वातील रस्त्याचे सहापदरी बांधकाम करण्यास मान्यता, 5262.36 कोटींचा मार्ग (सार्वजनिक बांधकाम विभाग)

5. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत महा इनविट (पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था) Maha InvIT (Infrastructure Investment Trust) स्थापन करण्यास मान्यता (सार्वजनिक बांधकाम विभाग)

6. महाराष्ट्र राज्यात जहाजबांधणी व जहाजदुरुस्ती सुविधा (Shipyard) आणि जहाज पुनर्वापर सुविधा

7. (Ship Recycling) विकसित करण्याबाबतच्या धोरणास मान्यता (परिवहन व बंदरे विभाग)

8. महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2025ला मान्यता (परिवहन व बंदरे विभाग)

9. ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक (Aggregator) धोरण (परिवहन व बंदरे)

10 सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवणार तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविणार (कृषी विभाग)

11. आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजबांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण विभाग विभाग)

12. म. रा. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा ₹10 लाखांवरून 15 लाख पुरये करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी