थोडक्यात
नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन
अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता
नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. नुकतेच विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले त्यानंतर आता महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे.
या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यासोबतच सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार असल्याची माहिती मिळत आहे.
नागपुरात आता उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून या अधिवेशनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.