थोडक्यात
नागपूरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन
अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता
नागपूरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. नुकतेच विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले त्यानंतर आता महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरात होणार आहे.
या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. नागपुरात आता आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार असून पाच दिवसीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.