महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्याचा 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार आज दुपारी २ वाजता विधानसभेत सादर झाला आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा असून अजित पवार त्या अपेक्षांवर खरे उतरतील, हा विश्वासही जनतेच्या मनात आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागलेली आहे.
उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी सतत प्रयत्न
म्हणून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे
थेट बँकेत पैसे जमा होत असल्याने क्रयशक्ती वाढली
बाजारात पैसा फिरत आहे
खरेदी विक्री वाढली आहे
दावोसमध्ये केलेल्या करारातून १६ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित
१०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे
जनतेच्या तक्रारींचे निवारण केले जात आहे
या कार्यक्रमातून गतीमान प्रशासन होईल
राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल
हा कार्यक्रम निरंतर ठेवण्यात येईल
आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा-1 पूर्ण झाला आहे. टप्पा- 2 मधील 3 हजार 939 कोटी रुपये किंमतीची 468 किलोमीटर रस्ते सुधारणांची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी 350 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा-3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6 हजार 589 कोटी रुपये किंमतीची 23 कामे हाती घेण्यात आली आहेत.