राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पार पडलं आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघंही सभागृहातून बाहेर पडले आणि त्यावेळी उद्धव ठाकरेदेखील सभागृहामधून बाहेर पडले. सगळे एकमेकांच्या समोर आल्यानंतर मिश्किलपणे टोलेबाजी झाल्याचेही दिसून आले.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सामोरासमोर आल्यानंतर एकमेकांना नमस्कार केला. मात्र यावेळी एकनाथ शिंदेंच्या कृतीकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे दिसताच न थांबता पुढे निघाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. उद्धव ठाकरेसुद्धा एकनाथ शिंदे यांना पाहून थांबले नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद अजून कायम असल्याचे दिसून आले.