ताज्या बातम्या

Devendra Fadanvis : संतोष देशमुखांच्या लेकीला मुख्यमंत्र्यांचा फोन, पत्रही पाठवलं ; भावनिक संवाद समोर

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी स्वतः मस्साजोग येथे जाऊन त्यांचं वैयक्तिक शुभेच्छा पत्रही वैभवीपर्यंत पोहोचवले.

Published by : Shamal Sawant

आयुष्याच्या सर्वांत कठीण प्रसंगातही शिक्षणाची वाट न सोडणाऱ्या मस्साजोग (ता. केज) येथील वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिच्या यशाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत (HSC Exam)तिने उल्लेखनीय यश मिळवलं असून, तिच्या या संघर्षमय यशाबद्दल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी फोन करून तिला शुभेच्छा दिल्या. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी स्वतः मस्साजोग येथे जाऊन त्यांचं वैयक्तिक शुभेच्छा पत्रही वैभवीपर्यंत पोहोचवले.

वैभवी ही मस्साजोग गावचे सरपंच आणि ग्रामविकास कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या स्व. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची कन्या आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पित्याची निर्घृण हत्या झाली होती. अशा मानसिक धक्कादायक परिस्थितीतसुद्धा वैभवीने हार न मानता बारावीची परीक्षा दिली आणि चांगले गुण मिळवत इतरांसमोर उदाहरण ठेवले.

नेत्यांकडून गौरव व प्रेरणा

निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अभिमन्यू पवार, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सदाभाऊ खोत, शिवसंग्राम नेत्या ज्योतीताई मेटे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिच्या जिद्दीला सलाम करत फोनवरून शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचा भावनिक संवाद

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैभवीशी फोनवर बोलताना म्हटलं, “वैभवी, खूप खूप अभिनंदन. एवढ्या गंभीर परिस्थितीतसुद्धा तू मेहनत करून उत्तम मार्क्स मिळवलेस. भविष्यात तुझ्या शिक्षणासाठी कुठलीही अडचण आली, तर आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. तुझ्या वडिलांचं स्वप्न तू नक्की पूर्ण कर.”

यावर वैभवीने भावनिक प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांना सांगितलं,मी नक्की मोठी होईन. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावीन. फक्त माझ्या वडिलांना लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. ”मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तिला विश्वास दिला की, “नक्की न्याय मिळेल. काळजी करू नको. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,” असे म्हणत तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

एक प्रेरणादायी उदाहरण

वैभवी देशमुखचं हे यश फक्त शैक्षणिक नाही, तर ती एक प्रेरणा ठरली आहे.जिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, पण जिची इच्छाशक्ती ढळली नाही. तिच्या संघर्षमय यशाचा सन्मान करत समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याने तिच्याकडून शिकण्यासारखं काहीतरी नक्कीच आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच