राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. आज रात्री ते कुटुंबासहित प्रयागराज येथे दाखल होणार आहेत. याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस यांच्याबरोबर प्रयागरागला जाणार आहेत. तसेच तिथे जाऊन गंगास्नानदेखील करणार आहेत.