महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतात. अशातच आता त्यांचा विधानसभेतील शायराना अंदाज समोर आला आहे. त्यांनी विरोधकांना शायरीमधून टोला लगावला आहे.
साकी अमरोहवी यांची एक शायरी सादर केली. "मंज़िलें लाख कठिन आएं, गुजर जाऊंगा. हौसला हार के बैठूंगा तो मर जाऊंगा...चल रहे थे जो मेरे साथ कहां हैं वो लोग? जो ये कहते थे कि रास्ते में बिखर जाऊंगा. लाख रोके ये अंधेरा मेरा रास्ता लेकिन, मैं जिधर रोशनी आएगी उधर जाऊंगा...'' अशी शायरी त्यांनी सादर केली आहे.