ताज्या बातम्या

Dam Overflow In Maharashtra : मे महिन्यातच धरणं भरली; मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी

अनेक लहान-मोठी धरणं मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरली आहेत

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात मे अखेरीस पावसाने चांगलाच जोर धरला असून, अनेक भागात मुसळधार पावसामुळे धरणं भरून वाहू लागली आहेत. विशेष म्हणजे, अनेक लहान-मोठी धरणं मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरली आहेत, ही बाब राज्यासाठी अभूतपूर्व ठरत आहे.

गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामध्ये विशेषतः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत 6 मेपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला आहे. 27 ते 28 मे या कालावधीत केवळ 24 तासांत विभागात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 44 मिमी पाऊस जालना जिल्ह्यात तर नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाचा प्रभाव जाणवला. या पावसामुळे मराठवाड्यातील सुमारे 680 गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून, काही ठिकाणी 65 मिमीहून अधिक पाऊस नोंदवण्यात आला.

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. पहिल्यांदाच मे महिन्यात हे धरणं ओव्हरफ्लो झाले असून, यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मात्र, धरणाजवळ काही तरुण सेल्फी घेण्यासाठी अनावश्यक धाडस करत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांगनदीवरील महींद धरण सलग आठ दिवस पडलेल्या पावसामुळे भरले असून, त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 85 दशलक्ष घनफुट क्षमतेचे हे धरण 362 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा पुरवते. मे महिन्यातच धरण भरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या अनपेक्षित पावसामुळे जलसाठ्यात वाढ होऊन पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे, मात्र संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी दक्षता घेणेही तितकेच गरजेचे आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा