राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (9 फेब्रुवारी) 61 वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उत्सुक असलेले बघायला मिळाले.
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींनी एक खास गिफ्ट त्यांना दिलं आहे. त्यांच्या वाढदिवसाला बहीणींनी तब्बल 61 किलोचा केक दिला आहे. या केकवर या केकवर लाडका भाऊ, लाडका मुख्यमंत्री, एकनिष्ठ दिघे साहेबांचा शिवसैनिक असे अनेक टॅग लिहिले आहेत. त्यामुळे हा केक अत्यंत लक्षवेधी ठरला आहे. या केकची चर्चादेखील सर्वत्र सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली.