ताज्या बातम्या

नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; पाहा फोटो

राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पहिल्या फेरीतील मतमोजणी मतमोजणी संपली. पहिल्या फेरीत 748 मतांची मोजणी झाली. यामध्ये द्रौपदी मुर्मू 540 मतांनी आघाडीवर होत्या. तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली होती. द्रौपदी मुर्मूंच्या मतांचे मूल्य 3 लाख 78 हजार इतकं होते. तर यशवंत सिन्हांच्या मतांचं 1 लाख 45 हजार इतकं होते.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पहिल्या फेरीतील मतमोजणी मतमोजणी संपली. पहिल्या फेरीत 748 मतांची मोजणी झाली. यामध्ये द्रौपदी मुर्मू 540 मतांनी आघाडीवर होते तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली होती. द्रौपदी मुर्मूंच्या मतांचे मूल्य 3 लाख 78 हजार इतकं होते तर यशवंत सिन्हांच्या मतांचं 1 लाख 45 हजार इतकी मतं होती. पहिल्या फेरीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मतांची मोजणी झाल्यानंतर यामध्ये 15 खासदारांची मतं बाद झालीत.

या विजयानंतर सर्वच स्तरामधून मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.महाराष्ट्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सरकारी कार्यालयाकडून पोस्ट करण्यात आलेल्या या अभिनंदनाच्या पोस्टमध्ये मुर्मू यांचा फोटोच नसल्याने असे का झाले असेल. असा प्रश्न सर्वांनाच पडला? या पोस्टमध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो दिसत असून यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय. किमान ज्या राष्ट्रपती झाल्या आहेत त्यांचा तरी फोटो लावायला हवा होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. तर काहीजण म्हणत आहेत की, राष्ट्रपती कोण झालंय हेच कळत नाही आहे.

ही पोस्ट शेअर करत “भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे- मुख्यमंत्री”, असे कॅप्शन लिहिले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा