मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला. शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात दरमहा 1 हजार 750 रुपये विद्यावेतन मिळत होते. यामध्ये 6 हजार 250 रूपयांची वाढ करून त्यांना दरमहा 8 हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ झाली असुन विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. फिजिओथेरपीआणि ऑक्युपेशनल थेरपीच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तसेच बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन सुरु करण्यात आले असून फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे.
शासकीय फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीच्या पदवीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या काळात दरमहा 1 हजार 750 रुपये मिळत होते. आता त्यात 6 हजार 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन मिळेल. पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना महागाई भत्त्यासह 10 हजार रुपये वाढवण्यात आले आहेत. ही वाढ 1 जून, 2025 पासून लागू होणार आहे.विद्यार्थ्यांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ झाल्यामुळे विद्यार्थीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.