एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निर्मला सीतारमण यांनी केंद्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांतच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प भूषण गगराणी यांनी देखील सादर केला. यानंतर आता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख जाहीर झाली आहे.
2025 च्या विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याबाबतच्या पुरवणी मागण्या 3 मार्चला सादर केल्या जाणार असून 4 मार्चला राज्यपाल अभिभाषणावर चर्चा सुरु होणार आहेत. तसेच हा अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 आठवडे चालणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.