राज्यात प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्ट प्रशासनाच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली झाली.
यासोबतच दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिग्गीकर यांची बदली करण्यात आली असून नाशिक महापालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नाशिकचे नवे महापालिका आयुक्त वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले असणार आहेत.
तसेच उद्योग विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी अनबाल्गन यांच्याकडे देण्यात आली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्त पद देण्यात आले आहे. आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली झाली. सोलापूर स्मार्ट सिटी सीईओ पदी गोपीचंद कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ असणार आहेत. तर पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओ पदी बदली झाली आहे.