Thackeray Bandhu Yuti Thackeray Bandhu Yuti
ताज्या बातम्या

Thackeray Bandhu Yuti : ठाकरेबंधूच्या युतीची वेळ ठरली, राऊतांनी ट्विट टाकत सांगितली वेळ आणि तारीख

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published by : Riddhi Vanne

 Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance Announcement : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही युती आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत फक्त “उद्या १२ वाजता” असे लिहिले आहे. या पोस्टनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

जागावाटपाबाबत काय चर्चा?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागांचे वाटप जवळपास ठरल्याची चर्चा आहे. मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे बोलले जाते. प्राथमिक माहितीनुसार शिवसेना (ठाकरे गट) सुमारे १४० ते १५० जागांवर उमेदवार देऊ शकते, तर मनसेला ६० ते ७० जागा मिळू शकतात. काही जागा मित्र पक्षांसाठी ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

महानगरपालिका निवडणुकीची माहिती

मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २४ डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  1. मोठी घोषणा: राज ठाकरे–उद्धव ठाकरे युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी 12 वाजता

  2. राजकीय परिणाम: राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता

  3. चर्चा संपली: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली युती प्रत्यक्षात येण्याची चिन्हे

  4. माहितीचा स्रोत: खासदार संजय राऊत यांची सोशल मीडिया पोस्ट

  5. संकेत: दोघांचा एकत्रित फोटो शेअर करत “उद्या 12 वाजता” असा संदेश

  6. घडामोडी: पोस्टनंतर राजकीय हालचालींना वेग

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा