BMC Election 2026  BMC Election 2026
ताज्या बातम्या

BMC Election 2026 : मुंबईची महासंग्राम! 227 जागांसाठी थरार, ठाकरे बंधू विरुद्ध महायुती, कोण होणार पालिकेचा King?

BMC Election 2026 : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत असून, तब्बल चार वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत आहे.

Published by : Riddhi Vanne

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत असून, तब्बल चार वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहेत.

मुंबईत रंगतदार लढत

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी सुमारे 1700 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रशासकीय राजवट संपवून आता मुंबईकरांना पुन्हा आपले प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळत आहे.

प्रमुख राजकीय खेळाडू

  • ठाकरे बंधूंची आघाडी : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र आले असून मराठी मुद्द्यावर जोरदार प्रचार करत आहेत.

  • महायुती: भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत असून सत्तेची पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न आहे.

  • काँग्रेस-वंचित आघाडी: काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र पर्याय म्हणून मैदानात आहे.

  • राष्ट्रवादी : अजित पवारांचा गट स्वबळावर, तर शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत आहे.

मतदानाची माहिती

वेळ : सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30

मुंबईत : एका प्रभागातून एक उमेदवार

इतर शहरांत : एका प्रभागातून 3 ते 5 उमेदवार

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मराठी अस्मिता, विकास आणि सत्तेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता मुंबईचा किल्ला कोण जिंकणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

थोडक्यात

🔹 महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान
🔹 मतदानाची तारीख : 15 जानेवारी 2026
🔹 तब्बल 4 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक
🔹 निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले
🔹 सर्व पक्षांकडून जोरदार तयारी आणि प्रचार
🔹 निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा