राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान झाले असून सध्या मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या चित्रानुसार भारतीय जनता पक्षाने राज्यभरात मोठी आघाडी घेतली असून तो सर्वात प्रभावी पक्ष ठरला आहे. भाजपचे उमेदवार सुमारे 900 हून अधिक जागांवर पुढे आहेत. शिंदे गटाची शिवसेना दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, काही शहरांतील निकालांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारंपरिक शिवसेना प्रभावाला मोठा धक्का बसला आहे. या शहरात भाजपने मोठी झेप घेतली असून कमळ चांगलेच फुलले आहे. यासोबतच एमआयएमनेही आश्चर्यकारक कामगिरी करत अनेक जागांवर आघाडी घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप सर्वाधिक जागांवर पुढे असून एमआयएम आणि शिंदे गटही काही प्रमाणात ताकद दाखवत आहेत. मात्र ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालेले नाही. एकूणच या निकालांमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून भाजप महापौरपदाच्या दिशेने मजबूत पावले टाकत आहे.