ताज्या बातम्या

Nagpur : माणुसकीचे दर्शन ! मोलकरणीने वाचवले नवजात अर्भक

कचऱ्यात सापडलेल्या बाळाला मोलकरणीने दिली नवसंजीवनी

Published by : Shamal Sawant

नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नागपूरमधील गजानन परिसरातील डम्पिंग परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात अर्भक सापडले. नुकतीच जन्मलेली चिमुरडी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली. एका घरकाम करणाऱ्या मोलकरणीने त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या बाळाला आपल्या जवळ घेतले. आणि याबाबत गजानन नगरमधील पोलिसस्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि नैतिक जबाबदारीबद्दल सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे

नागपूर शहरातील गजानन परिसरात एका मोलकरणीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये अचानक एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. आणि ती त्या दिशेने धावत गेली. तिथे तिने एका नवजात मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलेले पाहिले. ती मुलगी जोरजोरात रडत होती. मोलकरणीने तिला उचलून मायेने जवळ घेतले आणि आपल्या हृदयाशी कवटाळले. याबाबत तिने गजानन नगरमधील धंतोली पोलीस स्टेशनला माहिती दिली

पोलिसांनी तात्काळ तिथे येऊन त्या मुलीला ताब्यात घेतले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.त्या बाळाला तपासून तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. सध्या त्या बाळाचे आरोग्य व्यवस्थित आहे. काही वेळापूर्वीच त्या लहानग्या चिमुरडीचा जन्म झाल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.याबाबत धंतोली पोलीस अधिक तपास करत असून त्या नवजात अर्भकाच्या आईचा शोध घेतला जात आहे.

या मोलकरणीने दाखवलेल्या माणुसकीमुळे त्या मुलीचे प्राण वाचले. या घटनेमुळे पुन्हा एकदा निस्वार्थ माणुसकीचे दर्शन झाले आहे. नुकत्याच जन्मलेल्या चिमुरडीसोबत कसलाही संबंध नसताना त्या महिलेने त्या मुलीला वाचवले. यामुळे घटनेमुळे त्या मोलकरणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी