ताज्या बातम्या

Maharashtra New CM Oath: भाजपच्या मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, 'या' नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्री शपथविधीत भाजपच्या मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर आली आहे. 'या' नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणते नेते मंत्रिपदी विराजमान होऊ शकतात.

Published by : Team Lokshahi

23 तारखेला विधानसभेचा निकाल लागला त्या निकालात महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि महायुतीमध्ये भाजपच्या जागा जास्त संख्येने असल्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती पाहायला मिळाली. तर निकालानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

तसेच अजित पवार हे आता सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदावर आपल नाव कोरणार आहेत. या शपथविधीला अनेक नेते, साधू महंत तसेच कलाकारांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्याचसोबत या शपथविधीला अनेक नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तर या शपथविधी सोहळ्यादरम्यान भाजपच्या नेत्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचपार्श्वभूमीवर आता भाजपच्या मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर आली आहे. ज्यामध्ये भाजपच्या काही नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपच्या मंत्रिपदाच्या संभाव्य यादीमध्ये कोकणातून रविंद्र चव्हाण, नितेश राणे, गणेश नाईक यांची नावे समोर आली आहेत. त्याचसोबत मुंबईमधून मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रामधून शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील यांची देखील वर्णी लागलेली आहे.

उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन, जयकुमार रावल यांची नावे समोर आली आहेत. विदर्भमधून सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे हे मंत्रि‍पदाच्या शर्यतीत आहेत, तर मराठवाडामधून पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या या महाशपथविधी सोहळ्यानंतर यातल कोणाला संधी मिळणार आणि कोणाला कोणत मंत्रिपद मिळणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा